MSEDCL Buldhana Apprentice Recruitment 2026 - महावितरण (बुलढाणा सर्कल) मध्ये विजतंत्री,तारतंत्री व कोपा अप्रेंटिस पदासाठी एकूण 129 जागांसाठी भरती.
Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) Buldhana Apprentice Recruitment 2026 - महावितरण (बुलढाणा सर्कल ) मध्ये विजतंत्री,तारतंत्री व कोपा अप्रेंटिस पदासाठी एकूण 129 जागांसाठी भरती.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित संवसु मंडळ कार्यालय, बुलढाणा अंतर्गत सन 2026-27 करीता एकूण 129 पदे भरण्याकरीता पात्र शिकाऊ उमेदवारांची निवड समितीमार्फत गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. त्याकरीता पात्र शिकाऊ उमेदवारांनी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ते दि. 30.03.2026 चे सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करावा.
अर्ज भरताना Apprentice Profile पूर्ण करणे आवश्यक आहे. सदर फॉर्म भरल्यानंतर Form Print काढून त्यासोबत
-
ITI (संपूर्ण सत्राचे / वर्षाचे गुणपत्रक / प्रमाणपत्र)
-
इ.10 वी गुणपत्रक / प्रमाणपत्र
-
आधारकार्ड
-
रहिवासी पुरावा (LC Domecile)
-
जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
-
बँक पास बुक
-
Online भरलेला फॉर्म
इत्यादी छायांकित प्रतीत बुलढाणा मंडळ कार्यालयात दि.30.03.2026 सायंकाळी 05.30 वाजेपर्यंत सादर करावे.
MSEDCL Buldhana Apprentice Recruitment 2026 - महावितरण (बुलढाणा सर्कल ) शिकाऊ उमेदवार भरती.
| अ.क्र. | आस्थापना नाव | आस्थापना नोंदणी क्रमांक | वीजतंत्री | तारतंत्री | कोपा | संबंधित आस्थापनाचे भ्रमणध्वनी |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | बुलढाणा मंडळ अंतर्गत (बुलढाणा / खामगाव / मलकापूर / मेहकर विभाग) | E11162701135 | 57 | 54 | 18 | 9511712035 |
| PRO No. | 32 / Date : 10 March 2026 |
|---|---|
| जाहिरात / Advt.Notification PDF | Download PDF |
| पदसंख्या / Total Posts | 129 जागा |
| पदाचे नाव / Name Of Posts | ( वीजतंत्री | तारतंत्री | कोपा ) प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार |
| नोकरी ठिकाण / Job Location | बुलढाणा जिल्हा. |
| शैक्षणिक पात्रता / Educational Qualification | महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (10+2) व बुलढाणा जिल्ह्यातील शासनमान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून (कोपा, वीजतंत्री व तारतंत्री व्यवसाय) मागास प्रवर्गातील (अ.ज. व अ.जा. करिता) उमेदवारांकरीता 55% गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
| वयोमर्यादा / Age criteria (Maximum age limit relaxation) | शिकाऊ उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. दि.01.03.2026 पर्यंत 18 ते 30 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिल राहील. |
| निवड प्रक्रिया / Selection Process | गुणवत्ता यादी व मुलाखत |
| अर्ज शुल्क / Apllication Fees | फी नाही |
| परीक्षेचा दिनांक / Date Of Examination | लागू नाही |
| ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply | 30 March, 2026. 05: 30 Pm |
| अर्ज व नोंदणी करण्याची पद्वधत / How To Apply. | Online. प्रथम Apprenticeship India पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक. पूर्ण Profile तयार करणे. नंतर Form Print काढून कागदपत्रांसह सादर करणे. Apply Online |
| अधिकृत वेबसाइट /Official Website | https://www.apprenticeshipindia.gov.in/ Click Here |
| संपर्क / अर्ज सादर करण्याचे ठिकाण: | अधीक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय, विद्युत भवन, चिखली रोड, बुलढाणा |
अटी व शर्ती –
-
शिकाऊ उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. दि.01.03.2026 पर्यंत 18 ते 30 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिल राहील.
-
सदर उमेदवार हा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असावा.
-
शैक्षणिक पात्रता : अ) महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (10+2) व बुलढाणा जिल्ह्यातील शासनमान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून (कोपा, वीजतंत्री व तारतंत्री व्यवसाय) मागास प्रवर्गातील (अ.ज. व अ.जा. करिता) उमेदवारांकरीता 55% गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
-
मागासवर्गीय उमेदवारांची निवड भारतीय शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार करण्यात येईल त्याकरिता उपविभागीय अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
-
उमेदवाराने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
-
कोपा, वीजतंत्री व तारतंत्री या संवर्गाचा प्रशिक्षण कालावधी एक वर्षाकरीता राहील.
-
प्रशिक्षण कालावधीत शिकाऊ उमेदवारांना शासकीय नियमानुसार विदावेतन अदा करण्यात येईल.
-
उमेदवारांची Profile परिपूर्ण असणे आवश्यक आहे तसेच आधारकार्ड व Profile वरील माहिती सारखी असावी. अपूर्ण Profile असणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
-
शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती करिता 1:10 व अनुसूचित जमाती करिता 1:11 प्रमाणानुसार पदे राखीव व महिलांकरीता पदे राखीव राहील.
-
निवड झालेल्या पात्र उमेदवारांना बुलढाणा मंडळ कार्यालय अंतर्गत असलेल्या बुलढाणा / खामगाव / मलकापूर व मेहकर विभागीय कार्यालयातील शाखा कार्यालयामध्ये प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्याकरीता देण्यात आलेल्या ठिकाणीच प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक राहील.
-
निवड झालेल्या पात्र उमेदवारांनी सोबत येतांना आपली सर्व मूळ कागदपत्रे व त्यांची साक्षांकित दोन छायाप्रती सोबत आणावी.
-
प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना कंपनीच्या सेवेत सामावून घेणे बंधनकारक नाही याची नोंद घ्यावी.
-
जाहिरातीत बदल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवित आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
