MPSC Recruitment 2026 - State Services Main Examination 2025 - regarding Admission Certificates - Advt No. 001/2026 -राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 प्रवेश प्रमाणपत्र बाबत

MPSC Recruitment 2026 - State Services Main Examination 2025 - regarding Admission Certificates - Advt No. 001/2026 -राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 प्रवेश प्रमाणपत्र बाबत

Regarding Admission Certificates for the State Services Main Examination – 2025
Reference: Advertisement No. 001/2026
The admission certificates for candidates admitted to the State Services Main Examination 2025, scheduled by the Maharashtra Public Service Commission on 5th, 18th, 19th, and 26th April 2026, as well as 2nd May 2026, have been made available in the accounts of eligible candidates on the Commission’s online application system website: https://mpsconline.gov.in. 
  1. To gain entry into the examination hall, it is mandatory to bring a printed copy of the original admission certificate downloaded from the Commission’s website. Entry to the examination will not be granted without it. 
  2. Considering potential last-minute issues such as protests, marches, transport problems, or heavy rainfall, it is mandatory for candidates to arrive at the respective examination sub-center at least one and a half hours before the exam begins. Furthermore, candidates must be present at their assigned seats in the examination hall at least one hour before the actual start of the exam. 
  3. Under no circumstances will candidates be allowed entry into the examination hall after the final prescribed entry time, and the Commission will not bear any responsibility in this regard. 
  4. It is mandatory for candidates to follow the general instructions on the Commission’s website, the instructions on the admission certificate, and the ‘Guidelines for Examination’ available on the website. Action will be taken against candidates who violate these instructions, which may include temporary or permanent debarment at the Commission’s discretion, as per prevailing rules and legal provisions. 
  5. If any difficulty arises in obtaining the admission certificate, necessary assistance can be sought within the prescribed time via email at contact-secretary@mpsc.gov.in and support-online@mpsc.gov.in, or by calling 022-61133914 or 7303821822. 
 राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०२५ प्रवेश प्रमाणपत्राबाबत
संदर्भ:- जाहिरात क्रमांक ००१/२०२६
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ५, १८, १९ व २६ एप्रिल, २०२६ तसेच २ मे, २०२६ रोजी नियोजित राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील प्रवेशपात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
२. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
३. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
४. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
५. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘Guidelines for Examination’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना’ यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधनाची (Debar) तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.
६. प्रवेश प्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व/अथवा ०२२६११३३९१४ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल. 
State Services Main Examination 2025 - Admission Certificates - Advt No. 001/2026
राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२५ प्रवेशपत्र - जाहिरात क्रमांक ००१/२०२६
परीक्षेचा तपशील / Details Of Examination परीक्षा दिनांक / Date of Examination ई - प्रवेशपत्र / E-Admit Card
राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२५ 05,18,19 & 26 April 2026 & 02 May 2026 E-Admit Card
प्रवेशपत्र सूचना / Admit Card Notification Admit Card Notice
परीक्षेचे वेळापत्रक / Examination Time Table Time Table
जाहिरात सूचना / Advertisment Notification Pdf : Advt.PDF
अधिकृत वेबसाइट / Official Website : Click Here

सूचना व अभिप्राय

आपल्या वेबसाईटबाबत काही सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय असल्यास कृपया आम्हाला कळवा. तुमच्या मौल्यवान अभिप्रायामुळे आम्ही सेवा अधिक उत्तम बनवू शकतो.

अभिप्राय द्या