MPSC Recruitment 2026 – Maharashtra Group C Services Main Examination 2025- Advt.No.014/2026 -  महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ एकूण १८८४ जागांसाठी भरती.

MPSC Recruitment 2026 – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२५ एकूण १८८४ जागांसाठी भरती.

Maharashtra Group – C Services Main Examination – 2025
Number: CMA-0425/C.R.140/2025/Advertisement
Advertisement Number: 014/2026
Advertisement No. 124/2025 was published on October 06, 2025, for the Maharashtra Group-C Services Joint Preliminary Examination 2025 for various Group-C cadres in the state government service. The preliminary examination was conducted on January 11, 2026. After the publication of the advertisement, corrigenda were published on March 25, 2026, April 29, 2026, and April 30, 2026, to include the posts/cadres received through additional/revised requisitions from the government.
A total of 1884 posts will be filled through this examination.This mainly includes the following cadres:
  • Industry Inspector: 09 posts 
  • Tax Assistant: 73 posts
  • Technical Assistant: 04 posts
  • Sub-Inspector, State Excise: 125 posts
  • Clerk-Typist: 1673 posts
The result of the said Joint Preliminary Examination was declared on May 04, 2026 Based on the results, the Main Examination for candidates qualified for admission will be organized on Sunday, July 12, 2026, at the district centers of Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Nagpur, Nashik, Navi Mumbai, and Pune.
 

महाराष्ट्र गट – क सेवा मुख्य परीक्षा – २०२५

 
क्रमांक : सीएमए-०४२५/प्र.क्र.१४०/२०२५/जाहिरात
जाहिरात क्रमांक : ०१४/२०२६
 
राज्य शासनाच्या सेवेतील विविध गट-क संवर्गासाठी आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ करीता जाहिरात क्रमांक १२४/२०२५ दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून पूर्व परीक्षा दिनांक ११ जानेवारी, २०२६ रोजी घेण्यात आली होती. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून अतिरिक्त/सुधारित मागणीपत्रांनुसार प्राप्त पदांचा/संवर्गाचा प्रस्तुत परीक्षेत समावेश करण्यासाठी दिनांक २५ मार्च, २०२६, दिनांक २९ एप्रिल, २०२६ व दिनांक ३० एप्रिल, २०२६ रोजी शुद्धिपत्रके प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून एकूण १८८४ पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने उद्योग निरीक्षक (०९ पदे), कर सहायक (७३ पदे), तांत्रिक सहायक (०४ पदे), दुय्यम निरीक्षक-राज्य उत्पादन शुल्क (१२५ पदे), आणि लिपिक-टंकलेखक (१६७३ पदे) या संवर्गांचा समावेश आहे. सदर संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल दिनांक ०४ मे, २०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार, दिनांक १२ जुलै, २०२६ रोजी अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल.

 

महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा - २०२५

पदाचा तपशील / Post Description :
पद क्. / Post No. पदाचे नाव / Name Of Posts पद संख्या / No. Of Vacancy
०१ उद्योग निरीक्षक (उद्योग ऊर्जा व कामगार विभाग) ०९
०२ कर सहायक (वित्त विभाग) ७३
०३ तांत्रिक सहायक (वित्त विभाग) ०४
०४ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ( गृह विभाग ) १२५
०५ लिपिक-टंकलेखक ( शासनाचे विविध विभाग ) १६७३
Total १८८४
वयोमर्यादा तक्ता
वयोमर्यादा / Age Limit
अ.क्र. घटक उद्योग निरीक्षक,
उद्योग संचालनालय
तांत्रिक सहायक,
विमा संचालनालय
कर सहायक दुय्यम निरीक्षक, राज्य
उत्पादन शुल्क
लिपिक-टंकलेखक
१. किमान वयोमर्यादा
सर्व उमेदवार १९ १९ १८ १९ १९
२. कमाल वयोमर्यादा
२.१ सर्वसाधारण/महिला
(१) अमागास ३८ ३८ ३८ ३८ ३८
(२) मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ. ४३ ४३ ४३ ४३ ४३
२.२ प्राविण्यप्राप्त खेळाडू
(१) अमागास ४३ ४३ ४३ ४३ ४३
(२) मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ. ४३ ४३ ४३ ४३ ४३
२.३ माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी
(१) अमागास ३८+ सेवा कालावधी
+ ३ वर्षे
३८+ सेवा कालावधी
+ ३ वर्षे
३८+ सेवा कालावधी
+ ३ वर्षे
३८+ सेवा कालावधी + ३
वर्षे
३८+ सेवा कालावधी
+ ३ वर्षे
(२) मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ. ४३+ सेवा
कालावधी+३ वर्षे
४३+ सेवा कालावधी
+ ३ वर्षे
४३+ सेवा कालावधी
+ ३ वर्षे
४३+ सेवा कालावधी
+ ३ वर्षे
४३+ सेवा
कालावधी+३ वर्षे
२.४ दिव्यांग ४५ ४५ ४५ ४५ ४५
२.5 प्रकल्पग्रस्त -- -- -- -- ४५
२.६ भूकंपग्रस्त -- -- -- -- ४५
२.७ पदवीधर अंशकालीन कर्मचारी -- -- -- -- ५५
शारीरिक व टंकलेखन अर्हता
शारीरिक पात्रता
(एक) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क संवर्गाकरीता विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे :-
संवर्ग पुरुष महिला
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (१) उंची - किमान १६५ सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी)
(२) छाती - किमान ७९ से.मी. आणि फुगवून त्यापेक्षा ५ से.मी. जास्त.
(१) उंची - किमान १५५ सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)
(२) वजन- किमान ५० कि.ग्रॅ.

(दोन) संबंधित संवर्गातील नियुक्तीकरीता शिफारस पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम प्राधिका-याकडून तपासून घेण्यात येतील. विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.

टंकलेखन अर्हता

(एक) कर सहायक व लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे :-

कर सहायक लिपिक-टंकलेखक
मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
जाहिरात क्र. / Advt.No. 014/2026
जाहिरात / Advt.Notification PDF महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा - २०२५

Download PDF
परीक्षेचे नाव / Name Of Exam महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा - २०२५
पदसंख्या / Total Posts १८८४ जागा
पदाचे नाव / Name Of Posts पदांचा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे.
नोकरी ठिकाण / Job Location महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification शैक्षणिक अहर्ता : -
01) उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
02) उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(अ) सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(ब) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
03) पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका/पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
04) अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती/अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.
05) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा / Age criteria (Maximum age limit relaxation) Age criteria as on : 01 February, 2026.
वयोमर्यादा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे. .
निवड प्रक्रिया / Selection Process उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
01) लेखी परीक्षा
02) मुलाखत
03) कागदपत्र पडताळणी
04) वैद्यकीय तपासणी
अर्ज शुल्क / Apllication Fees 01) General(Open) : Fee: ₹ 544 /-+ 18% GST
02) SC/ST/OBC/EWS/ORPHAN/EX-Serviceman/ PwBD : Fee: ₹ 344 /-+ 18% GST
परीक्षेचा दिनांक / Date Of Examination 12 July, 2026.
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक / Online Application Start 21 May, 2026.
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply 04 June, 2026.
अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. Online.

Apply Online
अधिकृत वेबसाइट /Official Website https://mpsc.gov.in/home

Click Here

Important Dates

Event Date
Notification Released 20 May, 2026.
Online Application Start 21 May, 2026.
Last Date to Apply 04 June, 2026.
Examination Date 12 July, 2026.

सूचना व अभिप्राय

आपल्या वेबसाईटबाबत काही सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय असल्यास कृपया आम्हाला कळवा. तुमच्या मौल्यवान अभिप्रायामुळे आम्ही सेवा अधिक उत्तम बनवू शकतो.

अभिप्राय द्या