MPSC Recruitment 2026 – Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination - 2026 - Advt.No.017/2026 -  महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६ एकूण २६१९ जागांसाठी भरती.

MPSC Recruitment 2026 – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६ एकूण २६१९ जागांसाठी भरती.

Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination – 2026

Number: CMA-0426/C.R.42/2026/Advertisement
Advertisement Number: 017/2026

For the recruitment of a total of 2619 posts in the following cadres under various departments of the Government of Maharashtra, the Maharashtra Public Service Commission will conduct the Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination-2026 from September 27, 2026, at various centers across Maharashtra through an Online – Computer Based Test (CBT) method. The detailed schedule of the examinations will be published separately.



Sr. No. Cadre Department Total Posts
1 Industry Inspector, Industry, Energy and Labour Department 9
2 Technical Assistant, Finance Department 3
3 Tax Assistant Finance Department 282
4 Assistant Motor Vehicle Inspector, Group-C Home Department 461
5 Clerk-Typist Mantralaya Administrative Departments as well as various offices of the State Government in Maharashtra 1864
Total Posts 2619



2. The detailed breakdown of all the posts in various cadres to be filled through this examination is as mentioned in the accompanying Annexure-One.
3. The date of the Main Examination for the candidates who qualify for admission to the Main Examination based on the results of the Combined Preliminary Examination will be published separately.
3.1 Applications are invited through the Commission’s online application system from candidates who fulfill the terms and conditions prescribed in this advertisement.
3.2 Candidates who are interested in applying for the Assistant Motor Vehicle Inspector cadre in this examination and are educationally and physically qualified must submit the option for the said cadre while submitting the application.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६

क्रमांक : सीएमए-०४२६/प्र.क्र४२/२०२६/जाहिरात
जाहिरात क्रमांक : ०१७/२०२६
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण २६१९ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६, दिनांक २७ सप्टेंबर, २०२६ पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाईन – संगणक प्रणालीवर आधारित (CBT) पद्धतीने घेण्यात येईल . परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

अ. क्र. संवर्ग विभाग एकूण पदे
उद्योग निरीक्षक, उद्योग उर्जा व कामगार विभाग
तांत्रिक सहायक, वित्त विभाग
कर सहायक वित्त विभाग २८२
सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क गृह विभाग ४६१
लिपिक-टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय १८६४
एकूण पदे २६१९

२. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट-एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे .
३. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
३.१ प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
३.२ प्रस्तूत परीक्षेतील सहायक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरीता अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या आणि शैक्षणिक व शारीरिक दृष्ट्या पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करताना सदर संवर्गाचा विकल्प सादर करणे आवश्यक राहील.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६

पदाचा तपशील / Post Description :
पद क्. / Post No. पदाचे नाव / Name Of Posts पद संख्या / No. Of Vacancy
०१ उद्योग निरीक्षक (उद्योग ऊर्जा व कामगार विभाग) ०९
०२ तांत्रिक सहायक (वित्त विभाग) ०३
०३ कर सहायक (वित्त विभाग) २८२
०४ सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क ( गृह विभाग ) ४६१
०५ लिपिक-टंकलेखक ( मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय ) १८६४
Total २६१९
वयोमर्यादा तक्ता
वयोमर्यादा / Age Limit

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक :- दिनांक ०१ ऑक्टोबर, २०२६

विविध विविध अराजपत्रित प्रवर्ग/ उपप्रवर्गासाठी किमान व कमाल मर्यादा :-

अ.क्र. घटक उद्योग निरीक्षक,
उद्योग संचालनालय
तांत्रिक सहायक, विमा
संचालनालय
कर सहायक लिपिक-टंकलेखक सहायक मोटार वाहन निरीक्षक
१. किमान वयोमर्यादा
सर्व उमेदवार १९ १९ १८ १९ १९
२. कमाल वयोमर्यादा
२.१ सर्वसाधारण/महिला
(१) अमागास ३८ ३८ ३८ ३८ ३८
(२) मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ. ४३ ४३ ४३ ४३ ४३
२.२ प्राविण्यप्राप्त खेळाडू
(१) अमागास ४३ ४३ ४३ ४३ ४३
(२) मागासवर्गीय /अनाथ/आ.दु.घ. ४३ ४३ ४३ ४३ ४३
२.३ माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी
(१) अमागास ३८+ सेवा कालावधी +३ वर्षे ३८+ सेवा कालावधी +३ वर्षे ३८+ सेवा कालावधी +३ वर्षे ३८+ सेवा कालावधी +३ वर्षे ३८+ सेवा कालावधी +३ वर्षे
(२) मागासवर्गीय / अनाथ/आ.दु.घ. ४३+ सेवा कालावधी +३ वर्षे ४३+ सेवा कालावधी+३ वर्षे ४३+ सेवा कालावधी +३ वर्षे ४३+ सेवा कालावधी +३ वर्षे ४३+ सेवा कालावधी +३ वर्षे
२.४ दिव्यांग ४५ ४५ ४५ ४५ --
२.५ प्रकल्पग्रस्त -- -- -- ४५ --
२.६ भूकंपग्रस्त -- -- -- ४५ --
२.७ पदवीधर अंशकालीन कर्मचारी -- -- -- ५५ --
शारीरिक व टंकलेखन अर्हता
शारीरिक पात्रता
सहायक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरीता शारीरिक अर्हता :-
(अ) शारीरिक अर्हता खालीलप्रमाणे आवश्यक :-
संवर्ग पुरुष महिला
सहायक मोटार वाहन निरीक्षक (१) उंची - १६३ सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी)
(२) छाती - किमान ७९ सें.मी. (प्रसरणाशिवाय)
व किमान ५ सें.मी. (प्रसरण)
(१) उंची - किमान १५५ सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)
(२) वजन- किमान ४५ कि.ग्रॅ.

(ब) जे रंगांध नसून, ज्यांची दृष्टी चष्म्यासह वा चष्म्याशिवाय चांगली आहे.
(क) संबंधित संवर्गातील नियुक्तीकरीता शिफारस झालेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम प्राधिकार्‍याकडून तपासून घेण्यात येतील. विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.

टंकलेखन अर्हता
(एक) कर सहायक व लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे :-
कर सहायक लिपिक-टंकलेखक
मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
(दोन) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक : एसपीई २०१२/(१0८/१२)/साशि-१, दिनांक ३१ ऑक्टोबर, २०१३ अथवा तद्नंतर शासनाने वेळोवेळी आदेश काढून विहित केलेली संगणक टंकलेखन अर्हता- बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी ३० शब्द प्रति मिनिट अथवा बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट (लागू असेल त्याप्रमाणे) समकक्ष अर्हता म्हणून स्वीकारार्ह आहे.
(तीन) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरव्ही-२०२३/प्र.क्र.१/कार्यासन-१२, दिनांक १२ जानेवारी, २०२३ अनुसार केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवाराची लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून ४ वर्षात मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे विहित प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. तसेच, केवळ मराठी टंकलेखन धारण करणाऱ्या उमेदवाराची इंग्रजी भाषेत बहुतांश कामकाज होत असलेल्या विशिष्ट कार्यालयात (उदा. न्यायालय व न्यायाधिकरणातील सरकारी वकिलांची कार्यालये इत्यादी) लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून ४ वर्षात इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे विहित प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहील. अन्यथा संबंधितांची वेतनवाढ रोखण्यात येईल.
जाहिरात क्र. / Advt.No. 017/2026
जाहिरात / Advt.Notification PDF महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६

Download PDF
परीक्षेचे नाव / Name Of Exam महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६
पदसंख्या / Total Posts २६१९ जागा
पदाचे नाव / Name Of Posts पदांचा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे.
नोकरी ठिकाण / Job Location महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification शैक्षणिक अहर्ता : -
01) उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
02) उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(अ) सांविधिक विद्यापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(ब) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
03)सहायक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरीता अर्हता खालीलप्रमाणे राहील:-(१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी. च्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता, आणि(२) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील किमान ३ वर्षाची पदविका वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता.(३) स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्त्युच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेले उमेदवार देखील पात्र राहतील.
04) अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती/अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.
05) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
06) पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका/पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
वयोमर्यादा / Age criteria (Maximum age limit relaxation) Age criteria as on : 01 October, 2026.
वयोमर्यादा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे. .
निवड प्रक्रिया / Selection Process उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
01) संगणक प्रणाली आधारित परीक्षा
02) मुलाखत
03) कागदपत्र पडताळणी
04) वैद्यकीय तपासणी
अर्ज शुल्क / Apllication Fees 01) General(Open) : Fee: ₹ 394/- + 18% GST
02) SC/ST/OBC/EWS/ORPHAN/ PwBD : Fee: ₹ 294/- + 18% GST
03) EX-Serviceman : Fee: ₹ 44/- + 18% GST
परीक्षेचा दिनांक / Date Of Examination 27 September, 2026.
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक / Online Application Start 27 June, 2026.
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply 17 July, 2026.
अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. Online.

Apply Online
अधिकृत वेबसाइट /Official Website https://mpsc.gov.in/home

Click Here

Important Dates

Event Date
Notification Released 25 June, 2026.
Online Application Start 27 June, 2026.
Last Date to Apply 17 July, 2026.
Examination Date 27 September, 2026.

सूचना व अभिप्राय

आपल्या वेबसाईटबाबत काही सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय असल्यास कृपया आम्हाला कळवा. तुमच्या मौल्यवान अभिप्रायामुळे आम्ही सेवा अधिक उत्तम बनवू शकतो.

अभिप्राय द्या